Research- महागडी लग्न करणाऱ्यांचे होतात अधिक घटस्फोट

लग्न हे आता दोन जिवांचं मिलन राहिलं नसून तो एक ट्रेण्ड झाला आहे

जेव्हाही तुम्ही कोणत्या लग्नात जाता, तेव्हा त्या लग्नात साधारणपणे किती खर्च आला असेल याचा अंदाज लावता. प्रत्येकाला आपलं लग्न वेगळ्या पद्धतीने व्हावं असं वाटत असतं. लग्नातले कपडे, सजावटपासून ते खाण्यापर्यंतच्या साऱ्या गोष्टी वेगळ्या असाव्यात याकडे साऱ्यांचे लक्ष असते. यात साखरपुड्याची अंगठी तेव्हाची खरेदी हे सारे आलेच. लग्न हे आता दोन जिवांचं मिलन राहिलं नसून तो एक ट्रेण्ड झाला आहे. कोणाचं लग्न सर्वाधिक खर्चात झालं याबद्दल लोकांमध्ये चर्चा होत असते. पण तुम्हाला माहित आहे का की, महागडं लग्न घटस्फोटाचं कारण होऊ शकतं.नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये हे सिद्ध झालं आहे की, जे लग्नात पाण्यासारखा पैसा वाहतात त्यांचे लग्न तुटण्याची शक्यता सर्वाधिक असते. अटलांटा येथील एमोरॉय विद्यापिठातील एका सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे की, अशी लग्न दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. सुमारे ३००० हजार जोडप्यांवर संशोधन करण्यात आले होते. यात जोडप्यांचे लग्न कधी झाले हेही नमूद करण्यात आले होते. संशोधकांच्यामते, ज्या लग्नात ३ लाखांपासून ते ६. ८ लाखांपर्यंत खर्च केला जातो त्यांचे लग्न तुटण्याची शक्यता फार कमी असते. तसेच ज्या लग्नामध्ये १३ लाखांहून अधिक खर्च केला जातो ते लग्न लवकर मोडते. या संशोधनात त्या लग्नांचाही समावेश आहे ज्यात महागड्या साखरपुड्याच्या अंगठी घेतल्या जातात. तसेच लग्नानंतर हनिमूनला जाणाऱ्या जोडप्यांमध्ये घटस्फोट फार कमी होतात. त्यामुळे लग्नावर अधिक खर्च करण्यापेक्षा हनिमूनला जास्त खर्च केल्यास त्याचा फायदाच होतो.हेही वाचा-

VIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमीशोकसागरात बुडाले दापोली; चार भावांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'

Trending Now