Asian Games 2018: हिमा दास आणि मोहम्‍मद अनास यांची रौप्यकमाई !

जकार्ता, 26 ऑगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8 व्या दिवशी आज भारताच्या दोन धावपटूंनी आणि दोन घोडेस्वारांनी प्रत्येकी एक याप्रमाणे चार रौप्यपदके मिळवली. 400 मिटर धावण्याच्या शर्य़तीत हिमा दास आणि मोहम्‍मद अनास या दोघांनी, तर फुआद मिर्जा व आणखी एक अशी दोन रौप्यपदके घोडेस्वारांनी मिळवली.धावण्याच्या स्पर्धेत हिमा दासने 400 मीटर अंतर 50.79 सेकंदात पार केलं, तर मोहम्मद अनसने तेव्हढंच अंतर 45.69 सेकंदात कापून रौप्य पदके आपल्या नावे केली. तर गोविंदन लक्ष्मणन याने 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळले. त्याने हे अंतर 29.44 सेकंदात कापलं.आजच्या दिवसात पहीलं रौप्यपदक मिळवण्याचा मान घोडेस्वार फुआद मिर्जाला मिळला. तर दुसरे रौप्यपदकही याच खेळ प्रकारात भारताला मिळाले. अत्यंत चोख कामगिरी करत या खेळाडूंनी ही पदके भारताच्या खात्यात जमा केली. हिमा आणि मोहम्मद यांनीसुद्धा अत्यंत चमकदार कामगिरी करत दोन रौप्यपदके भारताला मिळवून दिली.

दरम्यान, सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू या दोघीजणी महिला एकेरीत, तर आर्चरी खेळ प्रकारात भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. PHOTOS : राज ठाकरेंच्या घरी झालं रक्षाबंधन साजरं

Trending Now