मगरींशी खेळायचंय? तर आफ्रिकेतल्या या गावात चला!

मात्र पश्चिम आफ्रिकेत असणाऱ्या बुर्किना फासो या देशातल्या बझुले या छोट्या गावात मगर आणि माणसं एकमेकांशी अगदी घरच्या सदस्याप्रमाणे वागतात आणि एकमेकांर प्रेम करतात.

Ajay Kautikwar
बुर्किना फोसो,ता.21 जून : मगर दिसताच अंगावर भितीनं शहारा येतो. माणूस आणि मगर यांची मैत्री असते असं सांगितलं तरी खरं वाटणार नाही. मात्र पश्चिम आफ्रिकेत असणाऱ्या बुर्किना फासो या देशातल्या बझुले या छोट्या गावात मगर आणि माणसं एकमेकांशी अगदी घरच्या सदस्याप्रमाणे वागतात आणि एकमेकांर प्रेम करतात. आनंदानं या गावात गेली शेकडो वर्षे मगर आणि माणसं एकत्र नांदत आहे.पश्चिम आफ्रिकेतील्या बझुल्ले या गावात मगरी आणि माणसं अनोखी मैत्री आहे. एक दोन नाही तर चक्क १०० मगरी या गावातील तलावात आहेत. बायमाणसांच पाणी भरणं, मुलांच पाण्यात खेळणं, आंघोळी करणं हे बिनदिक्कतपणे या तलावात होत असते. पण तरीही अजुन मगरींनी हल्ला झल्याची घटना इथं घडली नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. उलट या मगरी म्हणजे पुर्वजांच्या प्रतिकं असून त्या पवित्र आहेत असा या गावकऱ्यांचा समज आहे.वीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'साठी नियुक्त !

प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरातजबरदस्त शक्तिशाली असलेल्या, आणि क्रूरपणे सर्वशक्तिनिशी आपल्या भक्ष्याला लक्ष्य करणाऱ्या या मगरी आणि बझुल्ले ग्रामस्थांचं अनोखं नातं तयार झालं ते १५ व्या शतकात. त्यावेळी पश्चिम आफ्रिकेत भिषण दुष्काळ पडला होता. पाण्यापयी गुरं आणि माणसं तडफडु लागली होती काही महिलानी थोडं साहस करत मगरींच्या कोंडाळ्यात असलेल्या या तलावातलं पाणी भरण्याचा प्रयत्न केला आणि मगरींनीही ते शांतपणे भरु दिलं.

प्रियांका चोप्रा लिहितेय 'अनफिनिश्ड

ना घोडा, ना गाडी, थेट जेसीबीतून घरी आणलं नवरीला !

तेव्हापासुनच मगरी या इथल्या ग्रामस्थांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनल्या. या गावात जेव्हा मगर मृत पावते तेव्हा माणसांसारखं त्यांना पुरलं जातं. अनेकदा जेव्हा एखादी वयोवृद्ध मगर मृत होते तेव्हा त्या गावातील एखादा वयोवृद्ध व्यक्तिही मृत पावतो अशीही दंतकथा इथल्या लोकांमध्ये आहे.

बझुल्ले ग्रावातील हे अनोखं प्रेम पाहायला जगभरातुन हजारो पर्यक इथं दरवर्षी येतात मगरींच्या पाठींवर बसुन काही मागितलं तर ते मिळंत अशी बझुल्लेकरांची धारणा आहे. 

Trending Now