निमरत कौरसोबतच्या अफेअर चर्चांनी भडकले रवी शास्त्री, दिले असे उत्तर

याआधीही शास्त्री यांचं नाव अमृता सिंहसोबत जोडलं गेलं होतं

मुंबई, ०४ सप्टेंबर- भारतीय क्रिकेटचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौरच्या कथित अफेअरच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिले होते. मात्र आता रवी शास्त्री यांनी यात काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं. रवी शास्त्री म्हणाले की, तथ्य नसलेल्या गोष्टींवर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. याआधी निमरत कौरनेही ही बातमी खोटी असल्याचे म्हटलं होतं. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, निमरत आणि रवी शास्त्री गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची पहिली भेट २०१५ मध्ये एका कार कंपनीच्या कार्यक्रमावेळी झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फार वेळ लागला नाही.रवी शास्त्री यांचं नाव एखाद्या अभिनेत्रीसोबत जोडले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही शास्त्री यांचं नाव अमृता सिंहसोबत जोडलं गेलं होतं. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकलं नाही. यानंतर अमृताने सैफ अली खानशी लग्न केले तर १९९० मध्ये रवी शास्त्री यांनी रितु सिंहशी लग्न केलं. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.

VIDEO : दहीहंडीचे बक्षिस वितरण सुरू असताना कोसळला स्टेज

Trending Now