जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद तर ४ जखमी

जम्मू-काश्मीर, 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या बाटमालू परिसरात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमक सुरू झाली. या चकमकीत एक जवाण शहीद झालाय तर सीआरपीएफ तीन जवान आणि दोन पोलीस जखमी झाल्याचीही माहिती मिळालेय.सुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना लष्कर कमांडर नवीद जट्ट बाटमालू परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सुरक्षा दलांकडून पूर्ण परिसर घेरला गेला. पण आपल्या घेरलं असल्याची माहिती मिळतातच दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. या गोळीबारात आपला एक जवान शहीद झाला आहे तर सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Trending Now