संभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिक, 17 जुलै : न्यूज 18 लोकमतच्या बेधडक कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकराबद्दल अनेक दावे करणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींविरोधात नाशिकमध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीये. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी भिडेंनी संविधानाचा अपमान केल्याचं म्हणतं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीं तक्रार ही तक्रार दाखल केलीये.

VIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी खोडला

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे आणि राज्यघटनाही आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून लिहिली असा दावाच भिडेंनी केलाय. न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक डाॅ.उदय निरगुडकर यांनी संभाजी भिडे यांची बेधडक या कार्यक्रमात मुलाखत घेतली. या मुलाखतीत संभाजी भिडेंनी आंबापुराण, मनुवाद, भिमा कोरेगाव हिंसाचारावर उघड भाष्य केलं. एवढंच नाहीतर भिडेंनी मिलिंद एकबोटेंना क्लिन चिटही दिली.

मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडेमी ज्ञानोबा आणि तुकोबांची मनुबरोबर तुलना केली नाही. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते.मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता. त्या पुतळ्याखाली "मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता" असं बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलंय असा दावाच भिडेंनी केला. तसंच  संविधान देशासाठी अर्पण करताना मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला. याचा पुरावाही मिळेल ते मीडियाने शोधून काढावे असा सल्लाच त्यांनी दिला.

VIDEO : 'जय श्रीराम'च्या घोषणा देत स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण

Trending Now