सरन्यायाधिशांनी बोलावली कॉलेजियमची बैठक, जस्टिस जोसेफ यांच्या नावावर होणार चर्चा

सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी शुक्रवारी कॉलेजियमची म्हणजेच न्यायवृदांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जस्टिस केएम जोसेफ यांचं नाव पुन्हा केंद्र सरकारला पाठवायचं का याचा निर्णय होणार आहे.

Ajay Kautikwar
नवी दिल्ली,ता.10 मे: सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी शुक्रवारी कॉलेजियमची म्हणजेच न्यायवृदांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जस्टिस केएम जोसेफ यांचं नाव पुन्हा केंद्र सरकारला पाठवायचं का याचा निर्णय होणार आहे.सुप्रिम कोर्टातले दुसऱ्या क्रमांकाचे न्यायाधीश चेलमेश्वर यांनी याबाबत सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर अशी बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी दुपारी 1 वाजता अशी बैठक होणार आहे. कॉलेजियमने उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश जोसेफ यांचं नाव सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशपदासाठी केंद्राकडे पाठवलं होतं मात्र केंद्रानं ते नाव फेटाळत परत पाठवलं.यावर विविध राजकीय पक्षांनी टीकाही केली होती. आता कॉलेजीयम कुठला निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Trending Now