गावाकडचे गणपती : बुद्धी आणि शौर्याचं प्रतिक, कुलाबा किल्ल्यातला सिद्धिविनायक

दर्यावर्दी सरखेल कान्‍होजीराजे आंग्रे यांच्‍या पराक्रमाची साक्ष देत हा कुलाबा किल्‍ला अलिबागजवळ अरबी समुद्रात उभा आहे. याच किल्‍ल्‍यात असलेलं श्री सिद्धिविनायक गणपतीचं मंदिरही इथल्या इतिहासाची आठवण करून देतं.

मोहन जाधव, प्रतिनिधी, अलिबाग,ता.11 सप्टेंबर : इतिहासाचा साक्षीदार म्‍हणून कुलाबा किल्‍ल्‍यातील सिद्धिविनायक प्रसिद्ध आहे. भर समुद्रात असलेल्‍या कुलाबा किल्‍ल्‍यातील सिद्धिविनायकाच्‍या मंदिरात भाविकांची नेहमीच वर्दळ पहायला मिळते.गणेशोत्सवाच्या निमित्तानं खास ओळख इथल्या गणपतीची आणि इतिहासाची. दर्यावर्दी सरखेल कान्‍होजीराजे आंग्रे यांच्‍या पराक्रमाची साक्ष देत हा कुलाबा किल्‍ला अलिबागजवळ अरबी समुद्रात उभा आहे. याच किल्‍ल्‍यात असलेलं श्री सिद्धिविनायक गणपतीचं मंदिरही इथल्या इतिहासाची आठवण करून देतं.आंग्रे कालीन हे मंदिर म्‍हणजे स्‍थापत्‍य शास्‍त्राचा एक उत्‍तम नमुना आहे. हेमाडपंथी बांधकाम असलेल्‍या या मंदिराला दोन घुमट आहेत. अलिबागच्‍या किनाऱ्यावरून पाहिल्‍यास या कळसावरील घुमटाचं दर्शन होतं. या मंदिराचं मुख्‍य वैशिष्‍टय म्‍हणजे इथलं गणेश पंचायतन. 1759 मध्ये या गणेश पंचायतनाची स्थापना झाली. पंचायतन म्हणजे परिवार असं इतर ठिकाणी असतं.

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ :  पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

पण इथल्या पंचायतनामध्ये इतर देवता या युद्ध आणि शक्तीच्या प्रतिक आहेत. त्यामुळं हे मंदिर म्हणजे बुद्धीचं आणि शौर्याचं प्रतिक आहे अशी माहिती कान्‍होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिलीय. इथल्या मंदिरासमोर दीपमाळ असून शेजारी असलेल्‍या तलावात वर्षभर पाणी असतं.कोळी समाजाचे लोक आपली गलबते घेवून मासेमारीसाठी बाहेर पडताना किल्‍ल्‍याजवळ येवून या सिद्धिविनायकला नारळ अर्पण करतात आणि नंतरच मासेमारीसाठी बाहेर जातात. दर संकष्‍टीला इथं दर्शनासाठी येणारया भाविकांची संख्‍या मोठी आहे . दरवर्षी इथं माघी गणेशोत्‍सव मोठया भक्‍तीभावाने आणि उत्‍सा‍हात साजरा होतो .

गणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'

हा किल्ला मिश्रपद्धतीचा बांधलेला आहे. म्हणजे भरती असताना तो पाण्यात असतो आणि ओहटीच्या वेळी या मंदिरात जमिनीवरून जाता येतं. नव्या काळाची गरज ओळखून या किल्‍ल्‍यात जाण्‍यासाठी स्‍पीडबोटींचीही सुविधा आहे. त्‍यामुळे पर्यटक आणि भाविकांचा ओघ इथं वाढला आहे. महाराष्ट्राबरोबरच देश आणि विदेशातले भाविकही या मंदिराला भेट देत असतात.देवदर्शनाबरोबरच सागरी पर्यटनाचा आनंद घ्‍यायचा असेल तर कुलाबा किल्‍ल्‍यातीला गणपतीच्‍या दर्शनाला नक्‍की यायला हवं. 

Trending Now