देशाचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम मोदी सरकारमधून का पडले बाहेर ?

सुब्रमण्यम हे वाशिंग्टन येथील इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल इकोनॉमिक्सचे सिनिअर फेलो असून सध्या ते सुट्टीवर आहेत.

Sachin Salve
नवी दिल्ली, 20 जून : देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक आयुष्याच्या कारणांमुळे अर्थमंत्री अरूण जेटली यांना राजीनामा पाठवला असता तो मान्य सुद्धा करण्यात आला आहे.चिफ इकोनॉमिक एडवाइजर (CEA) अरविंद सुब्रमण्यम यांनी आपल्या खाजगी कारणांवरून राजीनामा दिला. येत्या ऑक्टोबर २०१८ला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. मात्र त्यांच्या कौटुंबिक कारणावरून त्यानी राजीनामा दिला. अरुण जेटली यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली.जेटली यांनी आपल्या पोस्टद्वारे, ‘काही दिवसांपूर्वी व्हिडिओ काॅन्फसिंगच्या माध्यमातून चिफ इकोनॉमिक एडवाइजर अरविंद सुब्रमण्यम यांच्याशी आमचे बोलणे झाले. यावेळी कौटुंबिक जबाबदारीमुळे मला अमेरिकेला माझ्या घरी परत जाण्याची इच्छा असल्याचं ते म्हणाले. त्याचे हे कारण खाजगी आहे.’ अशी माहिती दिली.

आईएमएफमध्ये सुद्धा कामसुब्रमण्यम हे आईएमएफचे विद्यार्थी होते. सेंट स्टीफंस कॉलेजमधून ग्रॅज्युएट सुब्रमण्यम हे भारत सरकारचे सल्लागार होते. जी-२० अर्थमंत्री विशेष समुहाचे ते सदस्य होते. सुब्रमण्यम हे काही काळ आईएमएफम अर्थशास्त्र पद सुद्धा त्यांनी सांभाळलेलं आहे.चिफ इकोनॉमिक एडवाइजर म्हणून कामसीइए खासकरून फायनान्स मिनिस्टरांना मायक्रो इकोनॉमिक तसंच इकोनॉमिक सर्वे विश्लेषणसोबतच अनेक जबाबदारीवर काम करतात.अमेरिकेला परत जाण्याच्या चर्चाएक वर्ष सेवा विस्तार मिळण्याअगोदरच सुब्रमण्यम आपला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून परत अमेरिकेला जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. सुब्रमण्यम हे वाशिंग्टन येथील इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल इकोनॉमिक्सचे सिनिअर फेलो असून सध्या ते सुट्टीवर आहेत......जेव्हा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला विरोधमागील वर्षी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी चिफ इकोनॉमिक एडवाइजर अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर टीका केली होती. अरविंद सुब्रमण्यम हे सुक्ष्म विचाराचे मॅनेजमेंट डिग्री होल्डर असून असे लोक अमेरिकेकडून थोपवले जातात. अर्थव्यवस्था सामान्य संतुलनात असताना अमेरिकेने अरविंद सारखे सुक्ष्म विचाराचे मॅनेजमेंट डिग्री होल्डर पाठवलेले आहेत. अशाप्रकारची टीका त्यांनी केली होती.

Trending Now