बुलढाणा अर्बन बँकेकडून डीएसकेंना 100 कोटींचं थेट कर्ज नाहीच !

गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डीएसकेंनी बुलढाणा अर्बन बँकेने अद्याप कोणतंही थेट कर्ज देऊ केलं नसल्याचा खुलासा बँकेचे अध्यक्ष राधेयश्याम चांडक यांनी केलाय.

Chandrakant Funde
14 फेब्रवारी, पुणे : गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डीएसकेंनी बुलढाणा अर्बन बँकेने अद्याप कोणतंही थेट कर्ज देऊ केलं नसल्याचा खुलासा बँकेचे अध्यक्ष राधेयश्याम चांडक यांनी केलाय. काल डीएसकेंनी मुंबई हायकोर्टात बुलढाणा अर्बन बँक आपल्याला 100 कोटींचं कर्ज देण्यास तयार असल्याचा दावा केला होता. त्यावर बँकेकडून यासंबंधीचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.बुलढाणा अर्बन बँक डीएसकेंना 100 कोटीचं कुठलंही थेट कर्ज देत नसून आम्ही डीएसकेंना 200 कोटीची मालमत्ता गहाण ठेवण्याचा प्रस्ताव दिलाय. त्यासोबतच डीएसकेंची 12 कोटींची मालमत्ता बुलढाणा अर्बन बँकेनं विकत घेण्याची तयारी दर्शवलीये. त्यामुळे डीएसकेंना बुलढाणा अर्बन बँक कुठल्याही प्रकारचे थेट कर्ज देत नसल्याचं यावेळी चांडक यांनी स्पष्ट केलंय. बँकेच्या या खुलाशामुळे डीएसकेंच्या आर्थिक अडचणी अजूनही संपल्या नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पुढच्या तारखेला तरी डीएसके हायकोर्टात गुंतवणूकदारांसाठीचे 50 कोटी खरंच भरणार का, याबाबत जरा शंकाच वाटू लागलीय.

Trending Now