'मी धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करतोय', मोबाईलवरचा मेसेज ठरला अखेरचा

सगळ्यात धनगर आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात एका तरूणाने आत्महत्या केली आहे.

परभणी, 13 ऑगस्ट : मराठा आरक्षणानंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. पण या सगळ्यात धनगर आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात एका तरूणाने आत्महत्या केली आहे. परभणी जिल्ह्यातील गोमेवाकडी येथील 19 वर्षीय युवकाने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तरुणाच्या या आत्महत्येमुळे धनगर समाज आणि मुलाचे कुटुंबिय संतप्त झाले आहेत.योगेश राधाकिशन कारके असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. धनगर आरक्षणासाठी या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी योगेशने 'मी धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे' असं त्याच्या मोबाईलवर टाईप केलं होतं. हा मेजेस त्याने इतरांना पाठवण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क नसल्यामुळे तो मेसेज जाऊ शकला नाही.या घटनेनंतर संतप्त कुटुंबिय आणि धनगर समाजातील लोकांनी सेलू पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी योगेशच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देऊ केली त्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं.पण दरम्यान, आरक्षणासाठी आपला लढा महत्त्वाचा आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय कधीच असू शकत नाही. त्यामुळे आपले प्राण घालवण्यापेक्षा त्यावर खंबीपरपणे उभं रहायला शिका.

दरम्यान, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. या तिथीचं औचित्य साधून आज धनगर समाज राज्यभरात रस्ते आणि महामार्गांवर रास्ता रोको आंदोलनाच्या स्वरूपात ही तिथी साजरी करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरू होईल. धनगर समाज संघर्ष समितीच्या परंपरेला अनुसरून हे आंदोलन 'शांततापूर्ण' पद्धतीनेच करण्यात येईल असं धनगर समाजाकडून करण्यात आसं आहे.या निर्धारावर धनगर समाज संघर्ष समिती ठाम आहे, शासनाने धनगर समाजास गृहीत धरू नये, अशी भुमिका धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यने घेतली आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. पण शांततेत पुकारलेल्या या आंदोलनाला कोणतंही हिसंक वळण लागता कामा नये ही भावना सगळीकडून व्यक्त होत आहे.

Trending Now