Asian Games 2018: अमित पंघलचा 'गोल्डन' पंच, भारताच्या खात्यात 14वे सुवर्णपदक

01 सप्टेंबर  : आशियाई क्रीडा स्पर्धेत अमित पंघलने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या या सुवर्णकामगिरीमुळे भारताच्या खात्यात १४वे सुवर्णपदक जमा झाले आहे. अमितने उज्बेकिस्तानच्याऑलिंपिक सुवर्णपदक विजेता हसनबॉय दुसामाटोवला 3-2 अशी मात देऊन त्याने हा किताब आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या गोल्डन पंचमुळे बॉक्सिंग चाहत्यांमध्ये मोठा जल्लोष पहायला मिळतोय. त्याचबरोबर सोशल मीडियातूनही अमितवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत  १३व्या दिवशी रौप्य आणि कांस्य पदकवर समाधान मानावे लागले होते. पण आज (शुक्रवार) १४व्या दिवशी अमित पंघलने बॉक्सिगमध्ये पुरूषांच्या ४९ किलो वजानगटात सुवर्णपदक मिळवले आहे. अमितच्या या कामगिरीमुळे भारताकडे एकून ६६ पदकांचा समावेश आहे.

GOLD NUMBER 14!BRILLIANT boxing by #TOPSAthlete Amit Panghal to secure a GOLD in Men's 49 kg Boxing by defeating 2016 Olympic Gold medalist!What a proud, proud moment this is for us! #KheloIndia #IndiaAtAsianGames #AsianGames2018 pic.twitter.com/PcWKWFVkH0

— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) September 1, 2018महिला हॉकी संघाला अंतिम फेरी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर बॉक्सिगमध्ये पुरूषांच्या ४९ किलो वजानगटातील भारतीय स्पर्धक विकास कृष्णला लागल्याने तो अंतिम सामना खेळू शकला नाही त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Trending Now