#BhimaKoregaon : तक्रार करणाऱ्यांना गोळ्या घाला, हाच न्यू इंडिया -राहुल गांधी

राहुल गांधी यांनी टि्वट करून या प्रकाराचा निषेध केलाय.

नवी दिल्ली, 28 आॅगस्ट : भीमा कोरेगाव प्रकरणी दंगलीचं माओवादी कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे घालून माओवादी विचारवंतांना अटक केलीय. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश होता. या प्रकरणी विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही तीव्र शब्दात सरकारवर टीका केलीये. जे तक्रार करतील त्यांच्यावर गोळी झाडा, हाच न्यू इंडिया आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे घालून माओवादी विचारवंतांना अटक केलीय. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश होता. यांच्या चौकशीतून पोलीसांना अनेक धागेदोरे मिळाले असून जे साहित्य जप्त करण्यात आलं त्यातूनही अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत. भीमा कोरेगावशिवाय इतर कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा समावेश आढळल्याने पोलीसांची चिंता वाढली आहे.

माओवादी समर्थक विचारवंत आणि विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलीसांनी अटक केलीय. पोलिसांच्या एका विशेष पथकाने राव यांच्या हैदराबादमधल्या घरी छापा टाकून ताब्यात घेतलं. राव यांना नामपल्लीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पुण्याला आणण्यात येणार आहे. या कारवाईनंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर येऊन कारवाईला विरोध केला. राव हे माओवादी समर्थक विचारवंत समजले जातात. आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधीही त्यांच्यावर माओवादी समर्थक असल्याचे अनेकदा आरोप झाले होते आणि प्रचंड टीकाही झाली होती.राहुल गांधी यांनी टि्वट करून या प्रकाराचा निषेध केलाय. भारतात फक्त एक संस्थाला मोकळी जागा आहे. याचा नाव राष्ट्रीय स्वयसेवक संघ आहे. इतर संस्था बंद करून टाका. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाका आणि जे तक्रार करतील त्यांना गोळ्या घाला. न्यू इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे असं खोचक टि्वट राहुल गांधी यांनी केलं. प्रकाश करात यांनीही निषेध केला व्यक्त सीपीआई नेते प्रकाश करात यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. हा लोकशाहीवर मोठा हल्ला आहे. आमची मागणी आहे की ज्या लोकांना अटक केली त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे आणि सुटका करावी अशी मागणी करात यांनी केली.आणीबाणी लागू होईलभारतात लवकरच आणीबाणी लागू होणार आहे. अशी टीका प्रसिद्ध लेखिका अरुंधती राॅय यांनी केली. तसंच जे काही घडत आहे ते देशासाठी धोकादायक आहे असं वाटत आता आणीबाणी लागू होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

Trending Now