भय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली

Sachin Salve
इंदूर,13 जून : सर्वांना तणावमुक्त राहण्याचा सल्ला देणारे भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली याचे  कारण काय हे गुढ मात्र अजुनही कायम आहे. भय्युजी महाराजांकडे लायसन्स असलेलं पिस्तुल होतं आणि त्या पिस्तुलानेच त्यांनी आत्महत्या केली असा खुलासा पोलिसांनी केला.ज्या पिस्तुलने भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली ते  पिस्तुल 'वेबले स्कॉटिश' या कंपनीचे होते. 2002 रोजी भय्यू महाराज यांनी हे पिस्तुल खरेदी केलं होतं. त्याचा परवाना हा 2002 पासून 2019 पर्यंत आहे. पोलीस अधिकारी जे पिस्तुल वापरात तेच पिस्तुल भय्यू महाराजांकडे होतं.

मध्यप्रदेशच्या गुप्तचर विभागाचे पोलिस महानिरिक्षक मकरंद देऊस्कर यांनी माहिती देताना सांगितलं की, इंदूर मधल्या 'सिल्व्हर स्प्रिंग' या निवासस्थनामधून सुसाईड नोट आणि पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून लायसन्स असलेलं पिस्तुल होतं अशी माहितीही त्यांनी दिली.आर्थिक आणि कौटुंबिक कारणांमुळं ते अतिशय तणावात होते अशी माहिती असल्यानं आत्महत्येची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे सहकारी यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही देऊस्कर यांनी दिली.दरम्यान, आज दुपारी  शोकाकुल वातावरणात भय्यू महाराज यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलीने भय्यू महाराजांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.========================================================

संबंधित बातम्या -

अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

मॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास

दोन लग्न...भय्यूजी महाराजांचं वैवाहिक आयुष्य !

राजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज!

'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं 

जिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं!

हे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या!

भय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

Trending Now