भारत बंद : भाजप म्हणतंय 'इंधनाचे दर कमी करणं मोदी सरकारच्या हातात नाही'

13:51 (IST)

13:50 (IST)

13:50 (IST)

चार बसेस जागेवर ठप्प... मनसे ने सोडली हवा

13:46 (IST)

गडचिरोली शहरासह जिल्हयात पेट्रोल भाववाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय या बंद दरम्यान गडचिरोली शहरातल्या बाजारपेठ सकाळपासुनच बंद होती कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात कांग्रेस कार्यकर्त्यांनी रैली काढुन बंदचे आवाहन केले होते.

13:21 (IST)

पेट्रोल-डिझेलचे दर सरकारच्या हातात नाही आहे. या त्रासात आम्ही जनतेच्या सोबत आहे. मात्र काँग्रेस याचं भांडवल करून राजकरण करतेयं. आम्ही यावर लवकरच तोडगा काढू

13:20 (IST)

दिल्ली - भाजपचे रवीशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद

12:51 (IST)

काँगेस भाजपासारखी सर्व सामान्य जनतेची हाल, विरोधी पक्षांचा ‘भारत बंद’ हा केवळ देखावा. आंदोलन करून केवळ जनतेची दिशाभूल केली जात आहे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

12:50 (IST)

अहमदनगर - पेट्रोल डिझेल GSTमध्ये का नाही, अण्णा हजारे यांचा भाजपला सवाल

11:41 (IST)

बाळा नांदगावकरांना काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतलंय

11:40 (IST)

अमरावतीमध्ये माजी आ. रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात शहर बंद करण्यासाठी निघाली मोटरसायकल रॅली. रिपाई, मनसेचा बंदला पाठिंबा

11:39 (IST)

कोल्हापूरच्या बिंदू चौकात आज आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

11:29 (IST)

काँग्रेस प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

11:09 (IST)

नवी मुंबई -- मनसेने कांदा बटाटा बाजारपेठ बंद पाडली. एपीएमसी बाजारपेठेत मनसेचे आंदोलन.

10:51 (IST)

नवी मुंबई -- मनसेने कांदा बटाटा बाजारपेठ बंद पाडली. एपीएमसी बाजारपेठेत मनसेचे आंदोलन.

10:49 (IST)

संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात, अंधेरी पोलिसांनी घेतले ताब्यात. अधेरीहून डीएन नगर पोलिसस्थानकात पोलिस गाडीतून रवानगी

पुणे, १० सप्टेंबर: पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई भागात बहुतेक व्यवहार अजूनन तरी सुरळीत असले तरी अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळल्याचं दिसतंय. पुण्यात मात्र भारत बंदला हिंसक वळण लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कुमठेकर रस्त्यावर पीएमपीची बस फोडली.  

Trending Now