भय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला अग्नी

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज हजारो शोकाकूल अनुयायांच्या उपस्थितीत इंदूरच्या मुक्तिधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ajay Kautikwar
इंदूर,ता.13 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज हजारो शोकाकूल अनुयायांच्या उपस्थितीत इंदूरच्या मुक्तिधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराजांची मुलगी कुहू हिने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.आज सकाळी इंदूर इथं असलेल्या सुर्योदय आश्रमात भय्यूजी महाराजांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथं हजारो अनुयायांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांची अंतयात्रा निघाली.एका सजवलेल्या ट्रकवर त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. शहाराच्या मुख्य मार्गावरून अंतयात्रा मुक्तिधाम इथं पोहोचली. यावेळी झालेल्या शोकसभेत मान्यवरांनी भय्यूजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी बालविकास मंत्री पंकजा मुंडे, गिरीष महाजन, एकनाथ शिंदे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह विविध पक्षांचे राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते.  

Trending Now