स्कुल बसचालकाने चिमुरड्याच्या पायावरून घातली बस, विद्यार्थ्यावर पाय गमावण्याची वेळ !

ओम ज्या बसने शाळेत जा ये करतो त्याच शाळेच्या बसखाली त्याचा पाय सापडल्याने त्याच्या पायाचे हाड पूर्णपणे मोडले आहे.

औरंगाबाद, 25 आॅगस्ट : औरंगाबादमध्ये एका खाजगी शाळेच्या बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला आपला पाय गमवावा लागण्याची शक्यता आहे. या बसचालकाने ओम वाघ नावाच्या विद्यार्थ्याच्या पायावरून बस चालवली. यामुळे त्याच्या पायाचे हाड मोडले.ओम वाघ हा शिव छत्रपती विद्यालयात नवव्या वर्गात शिकतो. ओम ज्या बसने शाळेत जा ये करतो त्याच शाळेच्या बसखाली त्याचा पाय सापडल्याने त्याच्या पायाचे हाड पूर्णपणे मोडले आहे. शाळेच्या बससमोर आलेल्या शेळ्या बाजूला करण्यासाठी बसचालक नवनाथ घोडके याने ओमला बस खाली उतरवले. शेळ्या बाजूला करून ओम बसमध्ये चढतांना खाली पडला. चालक नवनाथ याचे लक्ष नसल्याने ओम चा पाय बसच्या चाकाखाली आला आणि त्याच्या पायाचे हाड मोडले.ओमवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण मुजोर चालक नवनाथ याने ओमला बसमध्ये घेऊन दवाखान्यात लगेच न्यायला हवे होते. मात्र जखमी ओम आणि त्याच्या चुलत बहिणीला अपघात ठिकाणी सोडून निघून घेल्याने संताप व्यक्त होतोय. (संग्रहित फोटो)

PHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर !

Trending Now