हाच का पुरोगामी महाराष्ट्र? विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड

सवर्णांच्या मालकीच्या विहिरीवर पोहायला गेल्या कारणाने दोन मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Ajay Kautikwar
जळगाव, ता.14 जून : आमच्या मालकीच्या विहिरीवर पोहायला का गेलात या कारणावरून दोन मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावात ही घटना घडली आहे.या प्रकरणी तब्बल तीन दिवसांनी बुधवारी मध्यरात्री संबंधीत दोन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनमध्ये अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आजच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा दुर्दैवी घटना घडणे म्हणजे माणूसकिला काळीमा फासली गेली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.गावातल्या शेतात रविवारी ही मातंग समाजाची दोन मुलं पोहण्यासाठी उतरली होती. ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहीरीवर ते गेले होते. या शुल्लक कारणांवरून ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी या दोन मुलांच्या अंगातील कपडे काढून नग्न केले व त्यांना पट्याने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांची धिंडही काढली.

  

Trending Now