एशियाटिकच्या तिसऱ्या डॉ. टिकेकर फेलोशिपची घोषणा, अभ्यासकांना सुवर्णसंधी

एशियाटिक सोसायटीच्या डॉ. अरूण टिकेकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या तिसऱ्या अभ्यासवृत्तीची (फेलोशिप) घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई,ता. 27 ऑगस्ट : नामवंत संशोधक, अभ्यासक आणि नामवंत संपादक डॉ. अरूण टिकेकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या तिसऱ्या अभ्यासवृत्तीची (फेलोशिप) घोषणा करण्यात आली आहे. एशियाटिक सोसायटीच्या डॉ. अरूण टिकेकर प्रगत अध्ययन केंद्रातर्फे दरवर्षी ही अभ्यासवृत्ती दिली जाते. टिकेकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 1 फेब्रुवारी 2019 ला ही अभ्यासवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागिण्यात येत आहेत. यावर्षी ‘महाराष्ट्र किंवा पूर्वीचा मुंबई प्रांत यातील ऐतिहासिक आणि / किंवा समकालीन संस्कृती’ या मुख्य संशोधनक्षेत्रातील, खालील विषय देण्यात येत आहेत.१) लोकसाहित्य व मौखिक परंपरा२) सण व उत्सव—नवीन प्रवाह

३) वास्तुरूप वारसा (built heritage )व वर्तमानातील वारसा( living heritage)४)बदलत्या सामाजिक प्रथा व चालीरीती५) पाककला परंपरा व खाद्यसंस्कृतीसंशोधनक्षेत्रांत काम करणारे संशोधक, अभ्यासक व विद्यार्थी हे या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करू शकतील. ही अभ्यासवृत्ती रुपये सव्वा लाख एवढ्या रकमेची असून एका वर्षासाठी आहे. संशोधन प्रबंध मराठी किंवा इंग्रजी भाषेत ते सादर करू शकतील. ३० ते ६५ या वयोगटातील इच्छुकांना यासाठी अर्ज करता येतील. या अभ्यासवृत्तीची अधिक माहिती एशियाटिक सोसायटीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (www.asiaticsociety.org.in) संशोधन प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारिख २५ ऑक्टोबर २०१८ ही आहे. 

Trending Now