मुंबईत बेस्टची वीज कडाडली

Sachin Salve

30 ऑगस्ट : 'गोविंदा रे गोपाळा' म्हणत गुरूवारी मुंबईकरांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुरान आनंद घेतला मात्र आज मुंबईकरांच्या आनंदावर बेस्टने आणखी एक दरवाढीचा 'थर' लावला आहे. बेस्टनं 1 सप्टेंबरपासून वीज दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

0 ते 30 युनिटला 56 पैसे असलेला दर आता 67 पैसे होणार आहे. 100 युनिटला पूर्वी प्रतियुनिट दोन रुपये 61 पैसे मोजावे लागायचे. ते आता तीन रुपये होणार आहे. 300 युनिट्साठी पूर्वी प्रतियुनिट 4 रुपये 80 पैसे होते ते आता 5 रुपये 53 पैसे होतील.

तर 300 ते 500 युनिट्स वीजवापरासाठी पूर्वी प्रतियुनिट 6 रुपये 8 पैसे होते. ते आता सात रुपये 79 होणार आहे. वीज नियम आयोगानं या दरवाढीसाठी मंजुरी दिलीय. या दरवाढीचा मुंबईतल्या दहा लाख वीज ग्राहकांना फटका बसणार आहे.

Trending Now