भारतीय हद्दीत घुसून चीन सैनिकांनी फोडले कॅमेरे

Sachin Salve
09 जुलै : चीनच्या सैन्यानं भारताच्या लडाख भागात घुसखोरी केल्याची घटना ताजी असतानाच दोनच महिन्यात चीनी सैन्यानं पुन्हा एकदा घुसखोरी केलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीनं 17 जूनला लडाखमधल्या चुमारमध्ये घुसखोरी केली. या सैन्यां भारताचे बंकर्स उद्धवस्त केले. इतकंच नाही तर चीनच्या हद्दीवर देखरेख ठेवण्यासाठीच्या कॅमेर्‍यांच्या वायरही कापल्या. चुमार लेहपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा सीमाभाग वादग्रस्त आहे. गेल्या तीन महिन्यात चीनची ही तिसरी घुसखोरी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने मागिल महिन्यात 17 जून रोजी ही घुसखोरी केली होती. चीनच्या सैनिक घुसखोरी करून थांबले नाही तर त्यांनी हाय रेज्युलेशनचे कॅमेर तोडले. भारतीय सैन्याने चीनच्या घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी हे कॅमेरे लावले होते. या घुसखोरीची माहिती गुप्तचर खात्याने दिली होती. मात्र अजूनही सरकारने या प्रकरणावर चुप्पी साधलीय. 3 जुलैला दोन्ही देशांमध्ये फ्लॅग मिटिंग झाली तेव्हा भारतीय सैन्यानंच चीनच्या कुरापतीचा विषय मांडला होता. पुरावे म्हणून चीन सैनिकांनी तोडफोड केलेले कॅमेरेही सादर करण्यात आले होते. या अगोदर चीनने एप्रिल-मे महिन्यात लडाखच्या याच चुमार भागात दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये घुसखोरी करून छावणी उभी केली होती. एवढंच नाही तर चीनने ही जागा आमची आहे असा दावाही केला होता. चीनच्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र भारताच्या दबावामुळे चीनला माघार घ्यावी लागली होती.

Trending Now