एक अभेद्द 'भिंत..'

09 मार्चभारतात दिग्गज बॅट्समन अनेक झाले. आताही आहेत. पण यात राहुल द्रविडचं नाव भारतात आणि जागतिक क्रिकेटमध्ये ऑलटाईम ग्रेट्समध्ये घेतलं जाईल. बॅट्समन म्हणून तो किती महान होता हे आकडेवारी बघून कळतं. पण मैदानावरच्या त्याच्या वागण्यामुळे आदर्श क्रिकेटर म्हणून त्याची गणना होते. द्रविडचा हा क्रिकेट करिअरचा मोठा प्रवास. या युवा क्रिकेटरचं लॉर्ड्सवरचं हे क्रिकेट पदार्पण...चेहरा धीरगंभीर...आणि सचिन, सेहवागच्या तुलनेत बॅटिंगमध्येही आक्रमकता नाही. त्यामुळे तो खेळायला लागला तेव्हा दबक्या आवाजात एकच चर्चा होती याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. पण दिवस संपता संपता आपण काय चीज आहोत हे क्रिकेट जगताला त्याने दाखवून दिलं. पहिल्याच दिवशी मिस्टर कूल हे बिरुद त्याला चिकटलं. 95 रन्सवर तो आऊट झाला. पण जगाला सापडला तो शंभर नंबरी क्रिकेटर.लॉर्ड्स - 2011 - पहिल्या प्रयत्नात लॉर्ड्सवरची हुकलेली सेंच्युरीही त्याने पुढे पूर्ण केली. एकीकडे अवघी टीम जेव्हा पत्याच्या बंगल्यासारकी कोसळत होती तेव्हा द्रविड तीन तीन सेंच्युरीज ठोकत होता. द्रविडचं वेगळंपण यातचं होतं.जोहान्सबर्ग मध्ये 1997 साली ठोकलेल्या त्याच्या पहिल्या सेंच्युरीपासून ते ओव्हलवरील त्याच्या 36व्या सेंच्युरी पर्यंत द्रविड द वॉल बनून भारतासाठी उभा होता.असं म्हणतात सचिननं सर्वाधिक सेंच्युरी ठोकल्या. गांगुलीने सर्वाधिक हेडलाईन्स पटकावल्या. लक्ष्मणला सर्वाधिक सहानभुती मिळाली. पण द्रविड भारतीय क्रिकेटमधील शापित गंर्धव ठरला. त्यानं धावांचं डोंगर ऊभे केले. खरतर टेस्टमध्ये सचिननंतर याबाबतीत द्रविडचाच नंबर लागतो.अगदी रावळपिंडीपासून ते ऍडलेड..जमैका..हेडिंग्लेपर्यंत भारताने विदेशात जेव्हा जेव्हा विजय मिळवलं त्या सर्वात एकचं नाव कॉमन होतं आणि ते म्हणजे द्रविडचं.त्याचं ध्येय पक्क होतं. भारताला जिंकून द्यायचं. भारतासाठी जणू तो मिस्टर डिपेंडेबलच होता. द्रविडवर नेहमीच टेस्ट क्रिकेटरचा ठपका ठेवण्यात आला. वन डेच्या वेगवान फॉरमॅटसाठी द्रविड स्लो असल्याची टीका त्याच्यावर केली गेली. पण द्रविड या टीकेनंतरही शांत राहिला आणि दहा हजार रन्सचा टप्पा ओलांडत आपल्या टीकाकारांनाही शांत केलं. केवळ बॅटिंगचं नव्हे तर विकेटकिंपिंगमध्येही त्यानं आपले हात यशस्वीपणे चालवले.भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळात गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली त्याने उप कप्तानपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पण कॅप्टनम्हणूनच्या त्याची करिअर चढ उताराची राहीली. त्यातचं कोच ग्रेग चॅपेलच्या त्या काळाकुट्ट अध्यायामुळे द्रविडच्या कॅप्टनसीखालील भारतीय टीमला 2003 च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाद होऊ लागलं. पण असं असलं तरी विदेशातील 2 एतिहासिक टेस्ट सिरीज विजयामध्ये द्रविडची कॅप्टन्सी झळाळून उठली.द्रविडसारक्या दिग्गजला अशाप्रकारे क्रिकेटला अलविदा करताना पाहणे जिव्हारी लागणारं आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी मनाला यातना देणारी होती. मिस्टर डिपेंडेबल द्रविड ऑस्ट्रेलियात कुठतरी हरवला होता. ऑस्ट्रेलियातील त्याचं अपयश जणू निवृत्तीचं संकेत देत होतं.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना तो दिसणार आहेच. यावेळी राजस्थान रॉयलच्या कॅप्टनपदाची धुरा त्याच्या खांद्यावर असेल. एक नक्की यापुढे जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरेल तेव्हा मिस्टर डिपेंडेबल त्यात नसेल. नंबर तीनवरी ती हुकमी खेळी, मै हु नाचा तो विश्वास. खेळातील तो शांत पण आश्वासकपणा. द्रविड आम्ही खरोखरीच तुला मिस करू..

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

09 मार्च

भारतात दिग्गज बॅट्समन अनेक झाले. आताही आहेत. पण यात राहुल द्रविडचं नाव भारतात आणि जागतिक क्रिकेटमध्ये ऑलटाईम ग्रेट्समध्ये घेतलं जाईल. बॅट्समन म्हणून तो किती महान होता हे आकडेवारी बघून कळतं. पण मैदानावरच्या त्याच्या वागण्यामुळे आदर्श क्रिकेटर म्हणून त्याची गणना होते. द्रविडचा हा क्रिकेट करिअरचा मोठा प्रवास. या युवा क्रिकेटरचं लॉर्ड्सवरचं हे क्रिकेट पदार्पण...चेहरा धीरगंभीर...आणि सचिन, सेहवागच्या तुलनेत बॅटिंगमध्येही आक्रमकता नाही. त्यामुळे तो खेळायला लागला तेव्हा दबक्या आवाजात एकच चर्चा होती याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. पण दिवस संपता संपता आपण काय चीज आहोत हे क्रिकेट जगताला त्याने दाखवून दिलं. पहिल्याच दिवशी मिस्टर कूल हे बिरुद त्याला चिकटलं. 95 रन्सवर तो आऊट झाला. पण जगाला सापडला तो शंभर नंबरी क्रिकेटर.लॉर्ड्स - 2011 - पहिल्या प्रयत्नात लॉर्ड्सवरची हुकलेली सेंच्युरीही त्याने पुढे पूर्ण केली. एकीकडे अवघी टीम जेव्हा पत्याच्या बंगल्यासारकी कोसळत होती तेव्हा द्रविड तीन तीन सेंच्युरीज ठोकत होता. द्रविडचं वेगळंपण यातचं होतं.

जोहान्सबर्ग मध्ये 1997 साली ठोकलेल्या त्याच्या पहिल्या सेंच्युरीपासून ते ओव्हलवरील त्याच्या 36व्या सेंच्युरी पर्यंत द्रविड द वॉल बनून भारतासाठी उभा होता.असं म्हणतात सचिननं सर्वाधिक सेंच्युरी ठोकल्या. गांगुलीने सर्वाधिक हेडलाईन्स पटकावल्या. लक्ष्मणला सर्वाधिक सहानभुती मिळाली. पण द्रविड भारतीय क्रिकेटमधील शापित गंर्धव ठरला. त्यानं धावांचं डोंगर ऊभे केले. खरतर टेस्टमध्ये सचिननंतर याबाबतीत द्रविडचाच नंबर लागतो.

अगदी रावळपिंडीपासून ते ऍडलेड..जमैका..हेडिंग्लेपर्यंत भारताने विदेशात जेव्हा जेव्हा विजय मिळवलं त्या सर्वात एकचं नाव कॉमन होतं आणि ते म्हणजे द्रविडचं.त्याचं ध्येय पक्क होतं. भारताला जिंकून द्यायचं. भारतासाठी जणू तो मिस्टर डिपेंडेबलच होता. द्रविडवर नेहमीच टेस्ट क्रिकेटरचा ठपका ठेवण्यात आला. वन डेच्या वेगवान फॉरमॅटसाठी द्रविड स्लो असल्याची टीका त्याच्यावर केली गेली. पण द्रविड या टीकेनंतरही शांत राहिला आणि दहा हजार रन्सचा टप्पा ओलांडत आपल्या टीकाकारांनाही शांत केलं. केवळ बॅटिंगचं नव्हे तर विकेटकिंपिंगमध्येही त्यानं आपले हात यशस्वीपणे चालवले.भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळात गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली त्याने उप कप्तानपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पण कॅप्टनम्हणूनच्या त्याची करिअर चढ उताराची राहीली. त्यातचं कोच ग्रेग चॅपेलच्या त्या काळाकुट्ट अध्यायामुळे द्रविडच्या कॅप्टनसीखालील भारतीय टीमला 2003 च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाद होऊ लागलं. पण असं असलं तरी विदेशातील 2 एतिहासिक टेस्ट सिरीज विजयामध्ये द्रविडची कॅप्टन्सी झळाळून उठली.

द्रविडसारक्या दिग्गजला अशाप्रकारे क्रिकेटला अलविदा करताना पाहणे जिव्हारी लागणारं आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी मनाला यातना देणारी होती. मिस्टर डिपेंडेबल द्रविड ऑस्ट्रेलियात कुठतरी हरवला होता. ऑस्ट्रेलियातील त्याचं अपयश जणू निवृत्तीचं संकेत देत होतं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना तो दिसणार आहेच. यावेळी राजस्थान रॉयलच्या कॅप्टनपदाची धुरा त्याच्या खांद्यावर असेल. एक नक्की यापुढे जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरेल तेव्हा मिस्टर डिपेंडेबल त्यात नसेल. नंबर तीनवरी ती हुकमी खेळी, मै हु नाचा तो विश्वास. खेळातील तो शांत पण आश्वासकपणा. द्रविड आम्ही खरोखरीच तुला मिस करू..

Trending Now