मुंबापुरीत वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप

मनिष कुलकर्णी, मुंबई 03 नोव्हेंबरवर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर्सला पाहण्याची संधी भारतीय क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. मिस्ट युनिव्हर्स बॉडिबिल्डिंग स्पर्धा मुंबईत होतं आहे आणि आजपासून या स्पर्धेच्या प्राथमिक फेर्‍यांना सुरुवात झाली. 6 तारखेला मिस्टर युनिव्हर्सची निवड होणार आहे.90 देशांचे 400 बॉडी बिल्डर्स ठरवणार आहेत 2011 या वर्षाचा मि.युनिव्हर्स...होय या वर्षीची वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप भारतात होणार आहे. आणि सर्वात प्रथम हा मान मिळाला मुंबईला. मुंबईच्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.मुंबईत नुकतीच शेरू क्लासिक क्लबतर्फे जागतिक दर्जाची बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे देशातल्या तसेच महाराष्ट्राच्या खेळाडूंना या जागतिक स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करताना खर्चही तेवढाच लागतो. आणि इतर खेळांना सरकारकडून मिळणारा दुजाभाव याठिकाणीही कायम आहे.अतिक्रिकेटला भारतीय जनता आता कंटाळली. फॉर्म्युला वन, बॉडी बिल्डिंग यासारख्या खेळांना चांगला प्रतिसाद मिळाला तर भारतात या खेळांचं भवितव्य निश्चितच चांगलं राहणार आहे.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

मनिष कुलकर्णी, मुंबई

03 नोव्हेंबर

वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर्सला पाहण्याची संधी भारतीय क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. मिस्ट युनिव्हर्स बॉडिबिल्डिंग स्पर्धा मुंबईत होतं आहे आणि आजपासून या स्पर्धेच्या प्राथमिक फेर्‍यांना सुरुवात झाली. 6 तारखेला मिस्टर युनिव्हर्सची निवड होणार आहे.

90 देशांचे 400 बॉडी बिल्डर्स ठरवणार आहेत 2011 या वर्षाचा मि.युनिव्हर्स...होय या वर्षीची वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप भारतात होणार आहे. आणि सर्वात प्रथम हा मान मिळाला मुंबईला. मुंबईच्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

मुंबईत नुकतीच शेरू क्लासिक क्लबतर्फे जागतिक दर्जाची बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे देशातल्या तसेच महाराष्ट्राच्या खेळाडूंना या जागतिक स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करताना खर्चही तेवढाच लागतो. आणि इतर खेळांना सरकारकडून मिळणारा दुजाभाव याठिकाणीही कायम आहे.

अतिक्रिकेटला भारतीय जनता आता कंटाळली. फॉर्म्युला वन, बॉडी बिल्डिंग यासारख्या खेळांना चांगला प्रतिसाद मिळाला तर भारतात या खेळांचं भवितव्य निश्चितच चांगलं राहणार आहे.

Trending Now