नारायण राणेंबद्दल लवकरच कळेल -रवींद्र चव्हाण

Samruddha Bhambure

Your browser doesn't support HTML5 video.

28 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे येणार आहे की नाही येणार याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ मंडळी घेतील. त्याबद्दलच लवकरच कळेल असं सुचक वक्तव्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं.डोंबिवलीच्या शोभायात्रेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सहभागी झाले. यावेळी आमचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे यांनी त्यांच्याशी बातचीत केली. मराठी नववर्षाच्या आजच्या दिवशी शत:प्रतिशत भाजप होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची पावलं पडावी अशी प्रार्थना आम्ही करतोय असं चव्हाण म्हणाले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपची राजकीय उलथापालथ करण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर आहे. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील का असा प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले की,  नारायण राणे येणार आहे की नाही येणार याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ मंडळी घेतील. राणेंच्याबाबतीत लवकरच काही कळेल असं सुचक वक्तव्य त्यांनी केलं. तसंच शिवसेना आणि भाजपची युती अभद्य आहे. आम्ही आमचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now