सैराटफेम आर्चीची छेड काढणाऱ्याला अटक

Samruddha Bhambure

23 मार्च : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी 'सैराट'फेम अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हिचे राज्यातच नाही तर देशभरात लाखो चाहते आहेत. मात्र, अकलूजमध्ये एका तरुणाने रिंकूची छेड काढल्याची घटना समोर आली असून, या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

रिंकू राजगुरु हिची छेड काढल्याप्रकरणी दत्तात्रेय गरत या तरुणाला पोलिसांनी अटक केलं असून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकूची छेडछाड करणारा आरोपी ठाण्याचा रहिवासी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. माळशिरस इथल्या दिवाणी कोर्टात आरोपीला उशिरा हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

दरम्यान, रिंकू सध्या दहावीची परीक्षा देत असून ती लवकरच ‘सैराट’च्या कन्नड रिमेकमध्ये झळकणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now