अखेर चंदू चव्हाण उद्या मुळगावी परतणार

Sachin Salve

10 मार्च : पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय सैन्याचा जवान चंदू चव्हाण अखेर उद्या धुळे जिल्ह्यातील आपल्या गावी परतणार आहे. खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः चंदूला घेऊन धुळ्यात येणार आहेत.

चंदू गावी परतणार असल्यानं त्यांच्या नातेवाईंकांसह संपूर्ण ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. बोरविहिर गावात चंदू गावी येत असल्याची बातमी धडकल्या नंतर चंदुच्या नातेवाईक तसंच मित्रांनी आनंद व्यक्त केला. यावेळी चंदूच्या परिवाराने साखर वाटून आनंद साजरा केला. दरम्यान, चंदू गावी परतणार असल्याने गावकरी त्याच जंगी स्वागत करणार आहेत.

29 सप्टेंबरला जवान चंदू नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. संरक्षण विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून यशस्वी बोलणी करून चंदूला २१ जानेवारी रोजी पाकने भारताला सुपुर्द केले होते.  दरम्यान, भारतात परतल्यानंतर चंदूला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचारही सुरू होते. अखेर सहा महिन्या नंतर चंदू  आपल्या बोरविहिर गावी परतणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now