मुंबईचे नवे महापौर राहणार कुठे ?

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

प्रणाली कापसे, मुंबई07 मार्च : दादरचा महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला दिला, पण आता महापौर नेमके कुठे जाणार ?, याचा निर्णय झाला नाही. राणीच्या बागेतला बंगला हा महापौरांना शोभणारा नाही. महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांचा मलबार हीलचा बंगला महापौरांसाठी रिकामा केला जावा अशी मागणी केली जातेय.मुंबईचे महापौर कोण होणार ?, हा प्रश्न निकालात निघालाय. पण नवे महापौर राहाणार कुठे ? हा प्रश्न कायम आहे. कारण सध्याचं महापौर निवास हे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हस्तांतरीत करण्याचा निर्णय झालाय. पण नवे महापौर नव्या ठिकाणी जाण्यासाठी करावी लागणारी कुठलीही तरतुद महापालिकेनं केलेली नाही. महापौरांना कुठला बंगला द्यावा याबाबत अजून काहीच निश्चित नाही.

राणीच्या बागेतील बंगल्यामध्ये महापौरांचं बस्तान बसवण्यात अनेक अडचणी आहेत. कुठलंही प्राणी संग्रहालय हे संध्याकाळनंतर शांतता परिक्षेत्रात मोडतं. त्यात महापौरांकडे अनेक देश-विदेशातील पाहुण्यांचे येणं-जाणं असते. अशात प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना त्रास होण्याचा संभव आहे. शिवाय हा बंगला आकाराने छोटा आहे.सध्या महापालिका आयुक्त राहात असलेला किंवा अतिरिक्त आयुक्त राहात असलेला बंगला दिला जावा, अशी ही मागणी यशोधर फणसे यांनी केलीय. तर दुसरीकडे बीएमसी आयुक्तांवरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेनं नवी खेळी केल्याचं ही बोललं जातंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now