अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक

Samruddha Bhambure

Your browser doesn't support HTML5 video.

प्रफुल साळुंखे, मुंबई06 मार्च : राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. निष्प्रभ झालेला विरोधीपक्ष, शिवसेनेबरोबरचं पॅचअप अशी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांची जमेची बाजू आहे. तर नोटबंदी मुळं राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे. विरोधकांना नाही तर आर्थिक परिस्थितीचा सामना करताना मुख्यमंत्र्यांची कसोटी लागणार आहे.

कर्जमाफी, जवानांची आत्महत्या, जवणाबद्ल अनुद्गार, कृषीमाला भाव नाही , राज्याची बिकट आर्थिक परिस्थिती या मुद्यांचा अधिवेशनात विरोधक आक्रमक असतील. आज पाहिल्यादिवाशी दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज संपेल. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी आमदार महेश लांडगे हे बैलगाडीतून विधानभवनात येणार आहे हे आजच्या दिवसाचं आकर्षण असेल.मुंबई महापौरपदाच्या निवडणूकीत मुख्यमंत्र्यांनी व्यावहारीक आणि राजकीय शहाणपण दाखवल्यानं राज्य सरकारला धोकाही राहिला नाही आणि विरोधकांच्या तंबूत फारशी हवाही राहिली नाही. त्यामुळं सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात फार काही होण्याची शक्यता नाही. असं असलं तरी भाजप-सेनेच्या वादाचे वाभाडे काढण्याचा इशारा विरोधकांनी दिलीय.महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला. भाजपनं घवघवीत यश मिळवलं त्यामुळं आत्मविश्वास गमावलेल्या विरोधकांच्या आरोपांमध्ये फारसा दम असणार नाही.हे मुद्दे अधिवेशनात गाजतील : मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत 4 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.नोटबंदीचा फटका राज्य सरकारला चांगलाच बसला आहे. बांधकाम क्षेत्राच्या मंदीमुळे सरकारच्या तिजोरीत 6 हजार कोटींची तर उत्पादन शुल्कात 4 हजार कोटी ची तूट अपेक्षित आहे. यामुळं जलयुक्त शिवार सारख्या सारख्या लोकप्रिय घोषाणांवरचा खर्च कमी करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. केवळ राजकारणावर चर्चा न करता आर्थिक मुद्यांकडेही विरोधकांनी जास्त लक्ष दिलं तरच अधिवेशानातून काही निघण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now