राष्ट्रपतींनी अमिताभ आणि टीमसोबत पाहिला 'पिंक'

Sonali Deshpande
26 फेब्रुवारी : राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी 'पिंक' सिनेमा पाहिला. आणि सिनेमा बघताना त्यांच्यासोबत होते बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, चित्रपट निर्माते शुजित सरकार, तापसी पन्नू.पिंक गेल्या वर्षी रिलीज झाला. महिलांचं स्वातंत्र्य, स्त्रीला गृहित धरण्याची वृत्ती यावर सिनेमा परखडपणे भाष्य करतो. राष्ट्रपतींनी यावेळी सगळ्यांचा सत्कार केला.

सिनेमात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या साक्षी पन्नूनं तर हा न विसरता येणारा अनुभव असल्याचं म्हटलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now