स्वाईपवर फी न घ्यायला आपण काय जावई लागलो का ? -अजित पवार

Sachin Salve

04 जानेवारी : क्रेडिट आणि डेबिट स्वाईपवर फी न घ्यायला आपण त्यांचे जावई लागलो का ? असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  मोदी सरकारच्या स्वाईप फ्री योजनेची खिल्ली उडवली.

अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि मोदी सरकारवर तुफान टीका केली. मोदींनी स्वतःच्या जाहीरातबाजीवर तब्बल अकराशे कोटी खर्च केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यावेळी त्यांनी जाहिरातीतल्या महिलेची मिमिक्रीही केली. स्मार्ट सिटीवर बोलताना त्यांनी इडली डोसा खातो पण पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी योजनेत घ्या अशी व्यंकय्या नायडूंना विनवणी केल्याचंही सांगितलं. अजित पवारांनी सत्ताधारी सरकार आणि विरोधाकांवर विशिष्ठ शैलित टीका करत ,उपस्थितांमध्ये चांगलीच खस खस पिकली.अजित पवारांची टोलेबाजी

डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन सक्सेस म्हंटलं, नातेवाईक खुश  आत गेले तर पेशंट डेड- इडली दिला डोसा दिला ,गळ्या शपथ दिलं.म्हटलं ते राहु दया पण स्मार्ट सिटी दया.- कार्ड वर कमिशन न घ्यायला ते काय जावाई आहेत का ?- जियो सिमचा असा काही ठोका बसला, मागचं पुढचं सगळं वसूल- पेट्रोल पंपावर मोदी एके मोदी नुसत्या जाहिराती..माझे पैसे सुरक्षित आहेत,आर मोदीनाचं सगळं कळत फकीरा माणसाला अन् आम्हाला काही नाही असं कसं...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now