अजित पवारांच्या सभेत वीजचोरी

Samruddha Bhambure
12 डिसेंबर : इंदापूरच्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी घेतलेल्या सभेसाठी चोरीची वीज वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.अजित पवारांनी इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. या सभेसाठी जवळच्याच इलेक्ट्रीक पोलवरुन आकडा टाकून वीज चोरण्यात आली होती. गंमतशीर बाब म्हणजे अजित पवार याच सभेत कार्यकर्त्यांना नैतिक वागणुकीचे धडे देत होते. ते ज्या माईकवरुन बोलत होते. त्या माईकसाठीची वीज चोरीची होती हे त्यांना माहिती नव्हतं.

आकडे टाकून वीज चोरणाऱ्या सामान्य लोकांवर महावितरण तातडीनं कारवाई करते.पण राजकीय सभांसाठी चोरीची वीज वापरणाऱ्यांवर कोण कारवाई करणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now