सावंतांनी कृष्णाची भूमिका बजवावी, शल्याची नाही ; सदानंद मोरेंचं टीकास्त्र

Sachin Salve
03 डिसेंबर : मराठा क्रांती मोर्चा समितीतून अंग काढून घेण्याचा निर्णय निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी जाहीर केला. याच मुद्द्यावरून ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेंनी सावंतांवर टीका केली. जी समिती अस्तित्वातच नव्हती, तिचा राजीनामा द्यायचा प्रश्न येतोच कुठे ?, सावंतांनी अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या कृष्णाची भूमिका बजवावी, कर्णाचं सारथ्य करणाऱ्या शल्याची नाही, अशा शब्दांत मोरेंनी सावंतांवर ताशेरे ओढलेत.पी बी सावंत यांनी मराठाक्रांती मोर्चानंतर बनवण्यात आलेल्या समितीतून अंग काढून समितीच्या निर्णयांवर आणि कार्य पद्धतीवर टीका केली होती. तिचा सदानंद मोरेंनी कडक शब्दात समाचार घेतला.जी समिती अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे तिचा राजीनामा द्यायचा मुद्दा कुठं येतो असा थेट सवाल करत निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या कृष्णाप्रमाणे कृष्ण नीती करावी ना की करणाचं (कर्ण) सारथ्य करणाऱ्या शल्याची असा टोमणा सदानंद मोरे यांनी लगावलाय.

सावंत यांच्या प्रमाणे आपलाही फक्त सल्ला, मार्गदर्शन मराठा समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकरता मागितलं आहे आणि ते अनौपचारिक आहे असं स्पष्ट करत मोरे यांनी न्यायमूर्ती सावंत हे डाव्या, समाजवादी विचाराचे आहेत आणि मराठ्यांनी या विचारांची कास धरत क्रांती करावी, मराठ्यांना वेठीस धरू नये अशा शब्दात प्रहार केलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now