मराठा क्रांती मोर्चाला पी.बी. सावंत यांची सोडचिठ्ठी !

Sachin Salve
02 डिसेंबर : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी मराठा क्रांती मोर्चामधून अंग काढून घेतलंय. समितीवर न विचारता नेमणूक केली, व्यापक हिताच्या दृष्टीने विचार करून मी ती स्वीकारलीही.पण मला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहे असं सावंत यांनी स्पष्ट केलं.तसंच निवेदनं प्रसिद्ध केली जातायेत. मी या सगळ्याशी असहमत आहे असं सावंत यांनी म्हटलंय. याच कारणानं त्यांनी मराठा क्रांती मोर्चातून अंग काढून घेतलंय. निवृत्त न्या. पी.बी. सावंत यांचं निवेदन

परंतु, या समितीच्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले त्याची मला बिलकुल कल्पना नाही. तसंच हे निर्णय मला केव्हाही कळवण्यात आले नाहीत. आता असे समजते की, या समितीने काही निर्णय घेतले आहेत आणि त्याचे 26 पानांचे निवेदन मुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मी ना या निर्णयांशी ना त्या निवेदनाशी सहमत आहे."
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now