विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

Samruddha Bhambure
 1 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरच्या रामगड गावाजवळ विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची सुटका करण्यात आलीय. बिबट्या विहिरीत पडल्याची ही आणखी एक घटना समोर आलीय. मुक्ताईनगर तालुक्यातल्या शिवारात रामगड गावालगत असलेल्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला. दत्तू चौधरी यांच्या शेतातल्या या विहिरीला कठडे नव्हते. त्यामुळे रात्रीच्या वेळेला हा बिबट्या विहिरीत पडला असावा.बिबट्या विहिरीत पडल्याचं लक्षात येताच दत्तू चौधरींनी वनविभागाला या घटनेची खबर

अशी घटना घडली की बिबट्या पाण्याच्या शोधात आला असावा, असं गावकर्‍यांना वाटतं. पण शिकारीच्या मागे लागलेला बिबट्या घाईघाईत असताना विहिरीत पडतो, असा तज्ज्ञांचा कयास आहे. ज्या विहिरींना कठडे नाहीत, विहिरीच्या भोवतीचा भाग झुडपांनी वेढलेला आहे अशा विहिरींमध्ये बिबटे पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच बिबट्याचा वावर असलेल्या भागात विहिरींची नीट बांधबंदिस्ती करावी, अशी सूचना तज्ज्ञांनी केलीय. बिबट्या विहिरीत पडू नये म्हणून हा खबरदारीचा उपाय आहेच. शिवाय सगळ्यांच्याच सुरक्षिततेसाठी हा उपाय चांगला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now