जवानाबद्दलचं वक्तव्य ओम पुरींना पडलं भारी

Sachin Salve

 04 ऑक्टोबर : बारामुल्ला हल्ल्यातला शहीद जवान नितीनबद्दल केलेलं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींना चांगलंच महागात पडलंय. ओम पुरींंविरोधात मुंबईत अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

'नितीनला कुणी सांगितलं होतं सीमेवर जायला ? सैन्यात जायला ?' असं असंवेदनशील विधान ओम पुरींनी काल केलं होतं. त्यावर आज त्यांनी माफी मागितलीय. इतकी वर्षं आपल्या दर्जेदार अभिनय करणारे ओम पुरी अशी विधानं का करतायत, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. ओम पुरींचे वडील आणि आजोबा सैन्यात होते, असं खुद्द ओम पुरीच म्हणाले. असं असूनही इतकं बेजबाबदार विधान त्यांनी कसं केलं, हाच प्रश्न आहे. यानंतर पुरी थांबले नाहीत. आपणही पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्लेखोर पाठवले पाहिजेत, असा उपायही त्यांनी सुचवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now