नाव चंदू चव्हाण...भाऊ सैन्यात, आई वडील लहानपणी वारले..3 महिन्यांपूर्वीच सैन्यात दाखल

Sachin Salve
दिपक बोरसे, धुळे, 30 सप्टेंबर : भारत पाक सीमेवर चंदू चव्हाण हा जवान बेपत्ता झाला आहे. हा जवान धुळे जिल्ह्यातील आहे. चंदू बेपत्ता झाला असून तो पाकिस्तानच्या ताब्यात सापडला असल्याची माहिती मिळताच त्याच्या आजीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे बोरविहीर गावात शोककळा पसरली असून, चंदूला पाकिस्तानातून परत आणण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.चंदू बाबुलाल चव्हाण वय वर्ष 22... तीन वर्ष आधीच सैन्यात भरती झालेला हा जवान. आपल्या मोठ्या भावाच्या पाऊलावर पाऊल ठेवत चंदू सैन्यात भरती झाला. गेल्या काही दिवसापासून चंदू सीमा भागात पुंछ सेक्टरमध्ये 37 बटालियनमध्ये कार्यरत होता. मात्र चुकून तो पाकच्या सीमेत घुसल्याने त्याला पाक सैन्याने ताब्यात घेतले आहे.चंदूचा भाऊ भूषणही भारतीय सैन्यात गेल्या दहा वर्षांपासून देशसेवा करीत आहे. मात्र देश सेवा करणा•या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे देश पाकचा बदल घेतल्याचा आनंद साजरा करीत असताना चंदू अचानक पाक सीमेत घुसून घेला आणि त्याला पाक सैन्याने ताब्यात घेतला. ही बातमी ऐकून ज्या आजीने चंदूचा सांभाळ केला होता तीही हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांनी मृत्यू ला कवटाळलं. आई वडील लहापणीच गमावलेल्या चंदू, भूषण आणि त्यांच्या बहिणीला मामानीच सांभाळ केला.

चंदूला आई वडील यांच्या कडेच सैन्याचा वारसा लाभला आहे. विशेष म्हणजे बोरविहीर हे गाव सैनिक निर्माण करणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात एक दोन नव्हे तर तब्बल 100 जण सैन्यात देशसेवा करीत आहेत. भारती सैन्यदल आणि केंद्र सरकार चंदूला परत आणण्यासाठी निश्चितच प्रयत्न करती आहे असा विश्वास स्थानिकांनी आहे.चंदू पाक सैन्याचा ताब्यात आणि त्यात त्यांचा सांभाळ करणारी आजीही गेल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे. विशेष म्हणजे चंदूचा भाऊ भूषण शांती सेनेत आपले योगदान देऊन परत आला असताना त्याला या दुहेरी दुःखाचा सामना करावा लागत आहे. चंदूला सरकार लवकरच भारतात परत आणेल आणि पाकला पुन्हा अद्दल घडवेल असा विश्वास बोरविहीर च्या गावक•यांना आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now