अंधेरीचा राजाच्या दर्शनाला तोकड्या कपड्यात येणाऱ्यांना 'नो एन्ट्री'

Samruddha Bhambure

मुंबई, 07 सप्टेंबर :  अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळाने एक अजब फतवा काढला आहे. मंडळाने अंधेरीचा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी 'ड्रेसकोड' लागू केला आहे. तसं पोस्टर मंडळानं मंडपाच्या समोर लावला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांसोबतच पुरुषांनाही हा ड्रेसकोड लागू असणार आहे.

हाफ पँट, शॉर्ट्स आणि स्कर्ट घालून येणाऱ्या अंधेरीचा राजाचं दर्शन मिळणार नाही. आणि त्यातून पण कोणी तोकड्या कपड्यात दर्शनासाठी आलंच तर मंडळातर्फे त्यांना फुल पँट किंवा लुंगी घालायला दिली जात आहे. ही बंदी फक्त महिलांसाठीच मर्यादीत नाही. तर, पुरूषांनाही हा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंडळाच्या या निर्णयावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now