राज्यातल्या शेतीला दिवसा 12 तास वीज द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Samruddha Bhambure

06 सप्टेंबर : यंदा विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्याने पिकांना पाण्याची चांगलीच कमतरता भासणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पुढील तीन महिन्यांसाठी कृषी पंपासाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण विभागाला केली आहे.

शेतकऱ्यांना नोव्हेंबरपर्यंत रात्री ऐवजी दिवसा 12 तास वीज देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  त्याचबरोबर सौर उर्जेवर वीजपम्प सुरू करण्यासाठी संगमनेर इथं पायलट प्रोजेक्त सुरकू करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगीतलं.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच आनंदाचे दिवस येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे साडेपाचशे ते सहाशे कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now