तरुणांनी वाचवले बिबट्याचे प्राण, दुचाकीवरुन नेलं रुग्णालयात !

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

अहमदनगर, 13 जुलै : अहमदनगरच्या धामणगाव शिवारत एका बिबट्याला पाच तरूणांनी जीवदान दिलंय. तडफडत असलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी तरूणांनी आपला जीव धोक्यात घालून बिबट्याला स्वतः वनविभागाच्या नर्सरीत पोहच केले आहे. तरूणांनी केलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी शिवारात एका बिबट्याला पाच तरुणानी जीवदान दिले आहे. सकाळी 8 वाजण्याचा सुमारास बिबट्याचा डरकाळीचा आवाज कानावर आल्यावर तेथील काही तरुणांनी जाणिवपूर्वक आवाज्याच्या दिशेने जाऊन शोध घेतला त्यावेळी बिबट्या अगदी तडफडतानां दिसला. मात्र जवळ जाण्यासाठी कुणाची हिंमत होईना. त्यातील एकाने धाडस दाखवून जवळ जावून पाहिले तर त्याचे शरीर धडधड करत होते. मग सगळे बिबट्याच्या जवळ गेले आणि सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली.

परंतू, 2 तास उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारे वनविभागाने दखल घेतली नाही म्हणून त्यांनी स्वतःच चादरीची खोळी करून बिबट्याला मोटरसायकलवर तातडीने अकोल्यातील दवाखान्यात आणले. तेथेही कोणताही अधिकारी फिरकला नाही. तेथील वॉचमन आणि डॉक्टरांनी तातडीने इंजेक्शन आणि सलाईन लावून बिबट्याला सुंगाव येथील नर्सरीत त्या तरुणांना मोटारसायकलवर पाठविले. प्रल्हाद हासे,प्रविन हासे,भुषन आवारी,शिवाजी आवारी,संदीप आवारी असे धाडसी युवकांचे नाव आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now