संशोधक हरपला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रा.चिं. ढेरे यांचं निधन

Sachin Salve

01 जुलै : ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचं दिर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी पुण्यातल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म 21 जुलै 1930 सासी पुण्यातील निगडे येथे झाला. ढेर यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत विशेष अभ्यास होता. रा.चिं. ढेरे यांचा लोकसाहित्याचा गाढा अभ्यास होता. वयाच्या 80 व्या वर्षांपर्यंत त्यांचं संशोधन कार्य सुरू होतं. 60 पेक्षा जास्त संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी लिहले. महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यातले सांस्कृतिक दुवे उलगडण्याचं काम त्यांनी केलंय.

डॉ.रा.चिं. ढेरेंची साहित्यसंपदा करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मीदत्त संप्रदायाचा इतिहासश्री तुळजाभवानीदक्षिणेचा लोकदेव खंडोबाआज्ञापत्रत्रिविधालज्जागौरीश्रीनाथलीलामृतश्रीविठ्ठल : एक महासमन्वयस्वामी समर्थश्री व्यंकटेश्वरश्री कालहस्तीश्वरलोकसंस्कृतीचे उपासक
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now