सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा पुरवा, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Sachin Salve

मुंबई - 28 जून : राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये सुरक्षा उपाययोजना कमी असल्याबद्दल हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय.

राज्य सरकारनं राज्यातील सरकारी रुग्णालयात असलेल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षकांबद्दलची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र आज हायकोर्टात सादर केलं. त्यानुसार जेजे हॉस्पिटल, सायन हस्पिटल, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल, जी.टी. आणि नायर हॉस्पिटल्समध्ये दोन पोलीस कर्मचारी तर केईएममध्ये चार पोलीस कर्मचारी आहेत अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. ही जर मुंबईतील परिस्थिती असेल तर राज्यभरातील रुग्णालयांची परिस्थिती कशी असेल याची कल्पना केलेलीच बरी अशा शब्दांत हायकोर्टाने फटकारलंय. सरकारनं त्वरीत उपाययोजना न केल्यास मुंबई पोलीस आयुक्तांना रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश देऊ अशा शब्दांत राज्य सरकारला खडसावले.गेल्या काही काळात सातत्याने डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांविरोधात डॉक्टर संपावर गेल्यानं रुग्णांचे होणारे हाल होत असल्याने त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. मार्डने यापूर्वीच आपण संपाची हाक देणार नाही आणि संपावर जाणार नाही असं हायकोर्टात सांगितले आहे. तसंच शांततापूर्वक आंदोलन करु असही मार्डने कोर्टाला सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now