कामत समर्थनार्थ मुंबई काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनामे देणार ?

Samruddha Bhambure | News18 Lokmat

08  जून  : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. माजी खासदार गुरुदास कामत यांना समर्थन देण्यासाठी पालिकेतील काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. महापौर स्नेहल अंबेकर यांच्याकडे उद्या (मंगळवारी) हे सर्व नगरसेवक आपला राजीनामा पाठवणार असल्याचही बोललं जातं आहे.

संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कामत गटाला डावलण्यात येत होते. सोमवारी कामत यांनीही पक्षाचा त्याग करत राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केल्याने कामत समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

मुंबई महापालिकेत सध्या काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. त्यापैकी 25 नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 27 होईल त्यामुंळ पालिकेतली अनेक समिकरणहीं बदलणार आहेत.त्यामुळे मुंबई पालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट पक्षाला घातक ठरण्याचे संकेत आहेत. पालिका तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now