दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना कोर्टाचा दिलासा

Samruddha Bhambure

Your browser doesn't support HTML5 video.

मुंबई - 22 फेब्रुवारी : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना आज (मंगळवारी) चेक बाउन्स प्रकरणी मुंबई कोर्टानं दिलासा दिला आहे. यावेळी, दिलीप कुमार यांचा या प्रकरणाशी थेट सहभाग नव्हता, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.

1998 साली जे. के. एक्झिम ट्रेडिंग कंपनीमध्ये दिलीप कुमार संचालक होते. या कंपनीत डेक्कन सिमेंटस्‌नं 1 कोटींची गुंतवणूक केली. कंपनीला जेव्हा हे पैसे परत देण्याची वेळ आली, तेव्हा चेक बाऊन्स झाले, आणि डेक्कन सिमेंटस्‌नं दिलीप कुमार यांच्याविरोधात खटला दाखल केला. या प्रकरणाची आज गिरगाव इथल्या मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


Trending Now