नाशिकमध्ये कंपनीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

Sachin Salve

नाशिक -19 फेब्रुवारी : अंबड एमआयडीसीमधील क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद कऱण्यात अखेर यश आले आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले

नाशिकच्या अंबड एमआयडीसीमधील क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीत बिबट्या शिरल्यानं खळबळ उडाली होती. सकाळी 9 वाजता बिबट्या कंपनीच्या आवारात दिसल्याची माहिती कंपनीच्या कर्मचार्‍यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर कंपनीच्या कर्मचार्‍यांनीच सतर्कता म्हणून कंपनी मधील कॅबिन बंद करून सर्व कंपनीच्या बाहेर आले. हा बिबट्या रात्रीच कंपनीत घुसला असावा असा अंदाज वन विभागाने वर्तवला. या बिबट्याचे वय 1 वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध केली.बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करत तीन तासांनंतर त्याला जेरबंद केलं. गेल्या दहा वर्षांत 15 वेळा बिबट्या शहरात शिरल्याची घटना घडली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now