तरुणीला मारहाण प्रकरणी महिला पत्रकारालाही पोलीस स्टेशनमध्ये डांबलं

Sachin Salve

28 सप्टेंबर : लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसांनी एका तरुणीला बेदम मारहाण केली. मात्र, या प्रकरणाला वाचा फोडणार्‍या महिला पत्रकारालाही पोलिसांनी नाहक त्रास दिला. या घटनेचं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं म्हणून पोलिसांनी या महिला पत्रकाराला रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये डांबलं होतं.

लालबागच्या राजाच्या दरबारात महिला पोलीस कॉन्स्टेबल्सकडून एका तरुणीला मारहाण झाल्याचं उघड झालंय. ही तरुणी गणेशविसर्जनाच्या दिवशी व्हीआयपी गेटमधून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न करत होती. लालबागच्या कार्यकर्त्यांनी तिला अडवलं, थांबवण्याचा प्रयत्न केला.

पण, या दरम्यान दोघांमध्ये वादावादी झाली. आणि तरुणी पोलिसांच्या बॅरीकेटला लाथा मारू लागली. मग पोलिसमध्ये पडले. तेव्हा या मुलीने पोलिसांवरही आरडाओरड आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे कार्यकर्ते राहिले मागे आणि ही तरुणी आणि महिला पोलिसांमध्ये जुंपली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now