कोल्हापूरला संपाचा फटका, बँकेतील कामकाज ठप्प

Sachin Salve
02 सप्टेंबर : केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी धोरणाच्या निषेधार्थ आज पुकारलेल्या संपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले 70 ते 80 हजार कर्मचारी सहभागी झालेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक कार्यालयांमधलं आणि बँकांमधलं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय.अनेक कर्मचारी आज रस्त्यावर उतरले असून शहरातल्या लक्ष्मीपुरी भागातल्या बँक ऑफ इंडियासमोर बँक कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍यांनीही या संपात सहभाग नोंदवत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय. जिल्ह्यातल्या अनेक शाळाही बंद असून सीपीआर रुग्णालयातले कर्मचाराीही या संपात सहभागी झालेत. जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, सहकार, महावितरण पाटबंधारे विभाग अशा अनेक विभागांमधले कर्मचारी आजच्या संपात सहभागी झालेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now