पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

Samruddha Bhambure | News18 Lokmat

24 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथे सूतगिरणी परिसरात भक्षाच्या किंवा पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या बर्‍याच वर्षापासून बंद असलेल्या पाण्याच्या टाकित पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागला यश आलं आहे.

बिबट्या पाण्यात पडल्याचं सूतगिरणीच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे कर्मचारी आल्यावर त्यांनी लगेचच बिबट्याला पाण्याच्या टाकीतून सुखरूप बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला सुरूवात केली. पण बराच वेळ झाला तरी बिबट्याला बाहेर काढता येत नव्हता.

अखेर, क्रेनच्या सहाय्याने पाण्याच्या टाकीत एक पिंजरा सोडण्यात आला आणि त्यात हा बिबट्या लगेच येऊन बसला. आशा प्रकारे बिबट्याची पाण्याच्या टाकीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सध्या तरी हा बिबट्या वन कर्मचार्‍यांच्याच ताब्यात असून त्याला जंगलात सोडण्याची जबाबदारी वन विभागावर आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now