विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

Sachin Salve
27 जून : जुन्नर इथल्या जाधववाडी गावात विहिरीत एक बिबट्या पडला होता. या बिबट्याला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. बाळशिराम घोलप यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता.माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राच्या कर्मचार्‍यांनी सुमारे अर्धा तास प्रयत्न करून या बिबट्याला सहीसलामत बाहेर काढलं. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी गावकर्‍यांनी आधीच प्रयत्न सुरू केले होते.मात्र, बिबट्या निवारण केंद्राचे कर्मचारी आल्यानंतर त्याला वाचवण्यात आलं. शिकारीसाठी भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now