वीज ग्राहकांना दिलासा, 'महावितरण'च्या दरात 5-7 टक्के कपात

Sachin Salve
27 जून : महावितरण, रिलायन्स आणि टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळालाय. महावितरणच्या वीज दरात कपात करण्यात आलीये. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशावरून वीज दरात कपात करण्यात आलीये. महावितरणच्या सरासरी वीज दरात 5.75 टक्के कपात झालीये. 1 जूनपासून नवे सुधारित वीज दर लागू झालेत.

उद्योगांसाठी 7 ते 10 टक्के दराने आकारणी करण्यात आलीये. तर शासकीय शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसाठी नवी उप वर्गवारी आणि कमी दर आकारणी केली जातेय. त्याचप्रमाणे रेल्वेसाठी वीज दर 10 टक्क्यांनी कमी झालेला आहे. तसंच मीटरसह जोडणी असलेल्या कृषी पंप ग्राहकांना सवलत देण्यात आलीये. महावितरणासोबतच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, टाटा पॉवर या खाजगी वीज कंपन्याच्या वीज दरातही सुधारणा करण्यात आलीये.  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now