'अपने इलाके में कुत्रा खरंच शेर', कुत्र्याने बिबट्याला पिटाळले

Sachin Salve
25 जून : 'अपने इलाके मे कुत्ता भीशेर होता है...' पण याच्या उलट दृश्य  बोरिवलीत पाहण्यास मिळालंय. एका बंगल्यात घुसलेल्या बिबट्याला कुत्र्याने पळवून लावलंय. पण, हा कुत्रा लोखंडी ग्रीलच्या पलीकडे होता आणि बिबट्या अलीकडे...कुत्र्याच्या भुंकण्यामुळे बिबट्याला काढता पाय घ्यावा लागला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.दोन दिवसांपूर्वी मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या एका बंगल्यात बिबट्या घुसला होता. बिबट्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये घुसला आणि घरात कुठे प्रवेश मिळतो का याची पाहणी केली. दारापुढे लोखंडी ग्रील लावल्यामुळे बिबट्याला प्रवेश तर करता आला नाही. बिबट्याने ग्रीलच्या पलीकडे बांधलेल्या कुत्रावर पंजा उगारला. कुत्रानेही जोरदार प्रतिकार करत भुंकू लागला. कुत्र्याचे रौद्ररूप पाहुन बिबट्याला अखेर काढता पाय घ्यावा लागला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. जर हा कुत्रा समोर असता तर चित्र वेगळे असते हे नक्की. गंमतीचा भाग सोडला तर बिबट्याच्या घुसखोरीमुळे या परिसरातल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नॅशनल पार्कला अगदी लागून असणार्‍या वसाहतीत हे प्रकार नेहमी घडताय. याअगोदरही या वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार पाहण्यास मिळालाय. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now